Sawal Jawab सवाल जवाब" Song Marathi movie 2022 "Chandramukhi" sung by Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar and composed by Ajay - Atul. Starring Amruta Khanvilkar, Adinath Kothare.
Song:Sawal Jawab
Music Composed, Arranged, Conducted & Produced by: Ajay-Atul
Lyrics: Guru Thakur
Credits: Mastered by Gethin John at Hafod Mastering (Wales)
Dholki - Krishna Musale, Satyajeet Jamsandekar
Singers: Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar
Recorded & Mixed by Vijay Dayal @ YRF studios
Assistant Sound Engineer: Chinmay Mestry
Percussion - Prarap Rath, Ajay Gogavale
Halgi - Akshay Avahale
Harmoniyam - Aaditya Oak, Amit Padhye
Chorus - Aarohi Mhatre, Rucha Soman, Aditi Kulkarni, Manasi Paranjpe, Deepanshi Nagar, Sonal Naik
Music Label: Everest Entertainment
Lyrics
सवाल- 1 ( आईचा)
नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असेहे
ठाऊक अवघ्या जगताला ॥
अगं सांग तु ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
अन कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं ||
जवाब - 1 ( लेकीचा)
अहो नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
सांब शिवाची अर्धांगी तीज
माय पार्वती म्हणती गं ॥
अहो अंग मलातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती
अन त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं |
सवाल - 2 ( लेकीचा )
सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधाराचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं ||
देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिर्तीचा
अंधाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा ॥
जवाब - 2 ( आईचा)
सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंघारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची ॥
युगायुगांचे सत्य असे, ही
सखी सख्या विन नसते गं
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं ॥
सवाल ( वडिलांचा ) & (आईचा)
अग आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहुन मउसुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं त्याचं अद्भुत गं |
डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुना ||
देवदानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं ||
जवाब (लेकीचा )
किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं ||
लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ॥
जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे ||
sawal jawab song lyrics
0 Comments